Tuesday, January 1, 2008

शाळा skiing ची - १

ही skiing काय भानगड आहे या उत्सुकतेपोटी मित्रांसोबत आम्ही जवळच्याच Mount Southington या घसरकेंद्राकडे (स्की-केंद्र) निघालो. सगळेच नवे. पण मित्रांचे अनुभव ऐकून होतो. सगळेच जण हाताला, पायाला वा एखाद्या सांध्याला ईजा घेऊन परत आलेले होते. तेव्हा आपल्याला सुद्धा ईजा झाली तरी कामावर जास्त खंड पडू नये म्हणून सुटीतला पहिला दिवस पकडून निघालो होतो. एक नवीन अनुभव घेणे व जखमी न होता घरी परतने हे घ्येय ठरवून तेथे पोचलो.आरे बापरे! स्कीचे बूट आहेत की दगड! पाय घोट्यातून अजिबात हलवता येत नव्हता...

स्की सुद्धा चांगल्याच जड होत्या.

चला शाळा सुरु झाली एकदाची. दोन शिक्षक, त्यातली एक स्त्री. खरच येथे सगळ्या क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीत आहेत बा. (पण आपले काय) ... असो.आम्ही हे घडे शिकलो...
१. बुटात उभे राहिल्यावर गुढघ्यात वाकायला हवे. असे वाकल्यावर नडगीवर भार यायला हवा. नडगीवर भार येत नसेल तर बुट आणखी घट्ट करावा.
२. हातातल्या छाड्या/काठ्या (पोल) पकडताना दोरी/पट्टा आतल्या बाजूने मुठीत आलेला असावा. आंगठा व चाफेकळीच्या मधून हा पट्टा गेलेला असल्यास आंगठा दुखावू शकतो/उपटला जाऊ शकतो.
३. या छड्यांचा उपयोग केवळ तोल राखण्यासाठी करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता वाटत नसेल तर या न वापरल्यासही चालेल.
४. स्थिर उभे रहायचे असेल चढ-उतार हे डाव्या उजव्या बाजूला यावेत. चढ-उतार हे समोर वा पाठमोरे आल्यास तुम्ही घसरु लागता. तसेच कधीही टेकडीकडे तोंड करुन उताराकडे पाठमोरे उभे राहू नका. पाठमोर्या दिशेने
५. स्कीची रुंद बाजू जमीनीला कोणात ठेवावी जेणेकरुन त्याची कडा बर्फात रुतून बसेल.
६. उतारावरून स्की समांतर ठेवल्याने गती वाढते. गती कमी करायची झाल्यास पायांतील आंतर वाढवून स्कींना इंग्रजी उलटे V असे पकडावे.

हे धडे प्रत्यक्षात आणताना मात्रा आम्ही असे पडत होतो...
दोराला पकडून असे छोट्या टेकडीवर जाऊन हळू हळू सुरुवात केली. टेकडीवर पोचल्यावर मुख्य प्रश्न असायचा तो चढ-उतार हे डाव्या उजव्या बाजूला यावेत म्हणून बाजूला वळण्याचा. हे करताना आम्ही बहुतेक वेळा पडत होतो.
पण आता थोडे-थोडे जमायला लागले होते.

तितक्यात आमच्या एका मित्राने मोठ्या टेकडीवरुन जाऊन येण्याचा प्रयत्न केला. अपेक्षेप्रमाणे चार वेळा चांगला आपटला होता तो. मी मात्र ठरवल्या प्रमाणे पाया पक्का झाल्या शिवाय घाई करायची नाही हे ठरवले होते.

चार तास प्रयत्न केल्यावर आता मी त्या छोट्या टेकडीवरुन न पडता खाली येत होतो.
पहिल्या दिवशीची घसरगुंडी पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.


----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

1 comment:

Pradeep's said...

Photo chhan ahet ...