Thursday, September 27, 2007

पोलिसांचे खच्चिकरण

तिकडे उत्तर प्रदेशात पोलिसनिवडी बद्दल आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चाललेला कालगितुरा रंगात आलेला असतानाच इकडे आपल्या आदर्श म्हणवल्या जाणार्य़ा महाराष्ट्रातही खुद्द गृहमंत्रीच पोलिसांच्या मारेकयांना सामिल झाल्याने अधिच मनोधैर्य खचलेल्या पोलिसांचे अनखिनच खच्चिकरण झाले आहे. जीवाचे रान करून नव्हे जीवाची बाजी लावून अतिरेक्यांच्या मुस्क्या बांधनाया धडाडीच्या अनेक अधिकायांचे खच्चिकरण सतत राजकारणी आणि वरिष्ठ करत असतातच. परंतू काल-परवा पर्यंत आपले आबा "पोलिसांनो, तुमची शत्रे फक्त शोभेची नाहीत हे अतिरेक्यांना दाखवून द्या" असे म्हणत पोलिसांचे धैर्य वाढवण्याचे काम करताना आपण पाहत होतो. वाटत होते आता पुन्हा एकदा पोलिस अतिरेक्यांवर बंदुका रोखताना घाबरायचे नाहीत. पण कालच्या घटनेने पोलिसांचीच काय, सामान्य जिद्न्यासू माणसाची सुद्धा मती गुंग झाली असेल.
त्याचे झाले असे की, रमजानचा महिना सुरु झाला. सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा राजकारण्यांच्या इफ्तार पार्ट्या सुरु झाल्या. त्यात अर्थातच महाराष्ट्रात कॊंग्रेस सर्वात पुढे होते. आता जर सगळी गठ्ठा मते त्यांनाच गेली तर कसे, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या गोटात (आणि पोटात) ही उठला आणि त्याचाच परिणाम म्हणुन आबांनी सुद्धा इफ्तार पार्टी झोडली. आणि ती सुद्धा मुंबईतल्या पाकिस्तानात, थेट भिंवडीत. आबा हे सुद्धा विसरले की हीच ती भिवंडी जिथे त्यांच्या जवानांची (पोलिसांची) दिवसा ढवळ्या कातडी सोलून अन डोळे फोडून हत्या केली होती. हेच ते भिवंडीवाले होते ज्यांना त्यांच्या अतिरेकी कारवायांवर डोळा ठेवणारी पोलिस चौकी नको होती.
आबा, काय हे, कोणत्या तोंडाने त्या जवानांच्या विधवांना तोंड दाखवणार तुम्ही? तुमच्या सुद्धा तोंडाला जवानांचे रक्त लागलेच शेवटी! म्हणणार तरी काय म्हणा, तुम्ही पडले शेवटी मोठ्या दलाली राजकारण्याचे चेले ज्यांनी महाराष्ट्रात जाती-पातीच्या राजकारणाला लहाणाचे मोठे केले. तुमचे साहेबही शेवटी वर्षानुवर्षे नेहरु-गांधींच्या ताटताले मांजर होतेच ना. तेव्हा ते गूण तुमच्यात सुद्धा दिसणारच म्हणा. आम्ही जनताच शेवटी मूर्ख ठरलो. तुमच्या सारख्या राजलारण्यांच्या जातीवाल्यांकडून (खरे तर गिधडांकडून) काही अपेक्षा ठेवल्या.

Friday, September 21, 2007

मास्तरांची छडी

मला ना "छडी लागे..." ही म्हण तयार करणारा तो जो कोण आहे ना त्याला एकदा भेटायचय. कोवळ्या हातांवरच नव्हे तर मनावर देखील आघात करुन विद्या कशी प्रदान करणार आणि छडी न मारता का नको ते मला त्याला विचारयचय. आणि त्याच्या ह्या म्हणीमुळे कित्येक विकृत मास्तरांनी कोवळ्या बालमनावर केलेल्या अत्याचारांचा सुद्धा जाब विचारयचाय.
हेच पहा ना, आज गप्पा मारत असताना सौ.ने तिच्या लहाणपणी त्यांना असणाया एका मारकुट्या मास्तराच्या आठवणी सांगितल्या. तो मास्तर (हो, मला गुरुंबद्दल निंतात आदर आहे तरी सुद्धा अशा विकृत माणसाला मी जास्तीत जास्त एकेरीच संबोधू शकतो)... तर तो मास्तर मुलांना म्हणे चूक विधाने सांगून ते चूक आहेत की बरोबर ते विचारायचा. मुलांनी ते चूक आहे असे म्हटले तर "शहाण्या, माझे विधान चूक आहे असे म्हणतोस का" असे म्हणून बदडायचा आणि भितीपोटी बरोबर आहे असे म्हटल्यावर "गाढवा, येवढे येत नाही का" असे म्हणून हात/छडी मोकळी करायचा. या अशा राक्षसाच्या छडीने कसली विद्या मिळणार हो मुलांना?
आमचा असाच एक मास्तर होता. माझ्या वडील आणि अजोबांप्रमाणे मी पण कपाळावर गंधा लावायचो. तो मास्तर मला "टिळ्या"म्हणूनच संबोधायचा व काहीतरी कारण काढून बदडायचा. त्याची तासिका म्हटले की माझ्या पोटात भितीचा गोळा यायचा. पुढे महाविद्यालयीन जीवनात गेल्यावर कळले की तो कम्युनिस्ट विचारधारेचा होता व त्याला हिंदूत्वाच्या कोणत्याही धार्मिक चिन्हांचा राग असायचा. म्हणून मी त्याच्या घरी जायचे ठरवले. घर त्याच्या पत्नीने उघडले आणि काय चमत्कार, तिच्या कपाळावर टिकली अन गळ्यात मंगळसुत्र होते की! अर्था त्या दिवशी तो घरी नसल्याने वाचाला. नाही तर माझ्यातल्या तरुण रक्ताने त्याच्या एक-एक गुद्द्याचा हिशोब घेतला असता तर नवल नव्हते.
तर अशा या रक्षसी मास्तरांना कायद्याने आडवले जात असेल तर स्वागतर्हच नव्हे का? माझा या नवीन कायद्याला पूर्ण पाठिंबा आहे.

Friday, September 14, 2007

भुरका (विडंबन)

मूळ रचना - बहिणाबाई चौधरी
मूळ गीत:
आरे खोप्यामंदि खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलांसाठी तीनं
झोका झाडाले टांगला

विडंबनाची पार्श्वभूमी: आमच्या हीने खमंग (हिच्या हातचा म्हटल्यावर खमंग होणारच म्हणा) फोडणीचा भुरका केला होता. पोटात भुकेने कावळे काव-काव करत होते आणि जीभ हातभर बाहेर येऊन ताटात ताक-भाकरी-भुरका कधी येणार याची वाट पाहात होती. त्यादरम्यान आमच्यातल्या शिघ्रकवीने हे तारे तोडले...

आरे खादाड माणसा
हाणी भूरका चांगला
देखा जीभेसाठी तिने
झाल फोडणी टाकला ॥

तिची उलुशी शेगडी
तिची उलुशी कढई
परी त्याची चव बघ
सर त्याला जगी न्हाई ॥

लाल भूरकीच्या संगं
कुडी लसूण टाकला
फोडणीच्या गंधा मागं
उरी ठसका भरला ॥

आता हाणा कुस्कटूनं
हाटेलीला काय करा
बायकोची कारागिरी
जरा चाख रे भास्करा ॥

(१० ऒग. २००६)

Friday, September 7, 2007

श्रद्धेचा बाजार!

मागच्या काही वर्षांपासून भारतीय, विषेशतः हिंदी, चित्रपट सृष्टीत एक नवीनच ’ट्रेंड’ पहायला मिळत आहे. नायक नायिका परदेशात असतात (किंवा जातात). तिथे त्यांना भावनिक आधार हवा असतो. मग ते नेमके चर्चमध्येच जातात आणि येशुपुढे नतमस्तक होतात आणि पुढे ते संकटांवर मात करतात. तसे पाहिले तर यात काळेबेरे असे काहीच वाटत नाही. पण जरा खोलातून विचार केला तर मात्र पडद्यामागे बरेच काही चालले आहे हे लक्षात आल्यावाचून रहात नाही.
चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे व येथे निर्माते-दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने करत असतात. नायक-नायिकेच्या हातात शितपेयाची बाटली दाखवायची असो (DTPH, TAAL, etc), नयकाच्या कारचे टायर दाखवायचे असो (तरारांपाम), एखादे भोजनालय दाखवायचे असो (चक दे इंडिया मध्ये McDonalds) अथवा नयकांच्या अंगावर एखाद्या कंपनीचे कपडे, जोडे, टोपी वगैरे दखवायची असो, निर्माते दणकावून पैसे उकळत असतात. मग हे निर्माते नायक-नायिकांच्या गळ्यातले मोठ-मोठे क्रॊस (cross) दाखवण्यासाठी तसेच बळे-बळेच ओढून तानून चर्च दाखवण्यासाठी पैसे घेत नसतील का?
उदाहरणे शेकडो देता येतील. मी तसे चित्रपट कमीच पाहतो. पण मागच्य दोन-चार वर्षात चित्रपट पाहिला आहे अन तो जर ऐतिहासिक वगैरे नसेल तर त्यात चर्च दाखवले गेले नाही असे सहसा झालेच नाही. दिलवाले दुल्हनिया मधली सिमरण असो किंवा आजकाल आलेल्या कॆश (CASH) चित्रपटातला अजय देगवणने साकारलेला चोर असो, सगळे हिंदू असून चर्चमध्ये हटकून जातातच. तसेच अनेक चित्रपटांत त्यांचे स्वप्नात गाणे म्हणत-म्हणत चर्चमध्ये लग्नही उरकलेले असते. येवढेच कशाला विकली मालमाल सारख्या चित्रपटातल्या दुर्गम खेड्यात जिथे कोणला धड घरही नसते तिथे सुंदर चर्च, तसेच एक मान्यवर पाद्री सुद्धा असतो! आहे किनई कम्माल!

मी स्वतः अमेरिकेत फिरलो आहे. येथे कायम स्वरुपी वास्तव्यास आलेले अनेक लोक तसेच, व्यावसायिक, विद्यार्थि, कलाकार, यात्रेकरु अशा अनेक हिंदुंना मी भेटलो-बोललो आहे. त्यापैकी कोणीही येथे चर्च मध्ये गेलेले अढळले नाही; अगदी क्वचित कोणितरी हे चर्च अतून असते तरी काय या उत्सुकतेपोटी एखादवेळेस जाऊन आलेले आढळले. मात्र यातील सर्वच जन (हो, सर्वजन) येथे मंदिरात जाऊन आलेले होते, आणि बहुतेक सगळे श्रद्धेनेच!

मग या चित्रपट वाल्यांनाच चर्चेसचा येवढा पुळका कशासाठी?

मला वाटते हा भारतातल्या ख्रिस्ती मिशनयांच्या योजनेचा भाग असावा. त्यांच्या कडे पैसा आहे, त्यांचे ध्येय नक्की आहे (भारतात सर्वात जास्त नव-ख्रिस्ती तयार करणे) तसेच त्यांना मुत्सद्देगिरी सुद्धा चांगली जमते. भारतीय समाज हा भावनाप्रधान असल्याने ते भावना न भडकवता तसेच त्याच भावनांचा गैरफायदा घेऊन धर्मांतरे करीत असतात. चित्रपटांमधून ते त्यांच्या धर्माची ओळख करुन देत असावेत (psycological groundwork). जेणे करून जेव्हा ते प्रत्यक्ष लोकांसमक्ष जातात तेव्हा "हे काय आणखी नवीन!" असा भाव लोकांच्या चेहयावर येऊ नयेव पुढचे काम सोपे व्हावे.

खरे तर या सगळ्या प्रकाराचा सखोल अभ्यास अन चौकशीच झाली पाहिजे.