मूळ रचना - बहिणाबाई चौधरी
मूळ गीत:
आरे खोप्यामंदि खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलांसाठी तीनं
झोका झाडाले टांगला
विडंबनाची पार्श्वभूमी: आमच्या हीने खमंग (हिच्या हातचा म्हटल्यावर खमंग होणारच म्हणा) फोडणीचा भुरका केला होता. पोटात भुकेने कावळे काव-काव करत होते आणि जीभ हातभर बाहेर येऊन ताटात ताक-भाकरी-भुरका कधी येणार याची वाट पाहात होती. त्यादरम्यान आमच्यातल्या शिघ्रकवीने हे तारे तोडले...
आरे खादाड माणसा
हाणी भूरका चांगला
देखा जीभेसाठी तिने
झाल फोडणी टाकला ॥
तिची उलुशी शेगडी
तिची उलुशी कढई
परी त्याची चव बघ
सर त्याला जगी न्हाई ॥
लाल भूरकीच्या संगं
कुडी लसूण टाकला
फोडणीच्या गंधा मागं
उरी ठसका भरला ॥
आता हाणा कुस्कटूनं
हाटेलीला काय करा
बायकोची कारागिरी
जरा चाख रे भास्करा ॥
(१० ऒग. २००६)
Demonetization and Mobile Banking
8 years ago
No comments:
Post a Comment