Friday, September 7, 2007

श्रद्धेचा बाजार!

मागच्या काही वर्षांपासून भारतीय, विषेशतः हिंदी, चित्रपट सृष्टीत एक नवीनच ’ट्रेंड’ पहायला मिळत आहे. नायक नायिका परदेशात असतात (किंवा जातात). तिथे त्यांना भावनिक आधार हवा असतो. मग ते नेमके चर्चमध्येच जातात आणि येशुपुढे नतमस्तक होतात आणि पुढे ते संकटांवर मात करतात. तसे पाहिले तर यात काळेबेरे असे काहीच वाटत नाही. पण जरा खोलातून विचार केला तर मात्र पडद्यामागे बरेच काही चालले आहे हे लक्षात आल्यावाचून रहात नाही.
चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे व येथे निर्माते-दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने करत असतात. नायक-नायिकेच्या हातात शितपेयाची बाटली दाखवायची असो (DTPH, TAAL, etc), नयकाच्या कारचे टायर दाखवायचे असो (तरारांपाम), एखादे भोजनालय दाखवायचे असो (चक दे इंडिया मध्ये McDonalds) अथवा नयकांच्या अंगावर एखाद्या कंपनीचे कपडे, जोडे, टोपी वगैरे दखवायची असो, निर्माते दणकावून पैसे उकळत असतात. मग हे निर्माते नायक-नायिकांच्या गळ्यातले मोठ-मोठे क्रॊस (cross) दाखवण्यासाठी तसेच बळे-बळेच ओढून तानून चर्च दाखवण्यासाठी पैसे घेत नसतील का?
उदाहरणे शेकडो देता येतील. मी तसे चित्रपट कमीच पाहतो. पण मागच्य दोन-चार वर्षात चित्रपट पाहिला आहे अन तो जर ऐतिहासिक वगैरे नसेल तर त्यात चर्च दाखवले गेले नाही असे सहसा झालेच नाही. दिलवाले दुल्हनिया मधली सिमरण असो किंवा आजकाल आलेल्या कॆश (CASH) चित्रपटातला अजय देगवणने साकारलेला चोर असो, सगळे हिंदू असून चर्चमध्ये हटकून जातातच. तसेच अनेक चित्रपटांत त्यांचे स्वप्नात गाणे म्हणत-म्हणत चर्चमध्ये लग्नही उरकलेले असते. येवढेच कशाला विकली मालमाल सारख्या चित्रपटातल्या दुर्गम खेड्यात जिथे कोणला धड घरही नसते तिथे सुंदर चर्च, तसेच एक मान्यवर पाद्री सुद्धा असतो! आहे किनई कम्माल!

मी स्वतः अमेरिकेत फिरलो आहे. येथे कायम स्वरुपी वास्तव्यास आलेले अनेक लोक तसेच, व्यावसायिक, विद्यार्थि, कलाकार, यात्रेकरु अशा अनेक हिंदुंना मी भेटलो-बोललो आहे. त्यापैकी कोणीही येथे चर्च मध्ये गेलेले अढळले नाही; अगदी क्वचित कोणितरी हे चर्च अतून असते तरी काय या उत्सुकतेपोटी एखादवेळेस जाऊन आलेले आढळले. मात्र यातील सर्वच जन (हो, सर्वजन) येथे मंदिरात जाऊन आलेले होते, आणि बहुतेक सगळे श्रद्धेनेच!

मग या चित्रपट वाल्यांनाच चर्चेसचा येवढा पुळका कशासाठी?

मला वाटते हा भारतातल्या ख्रिस्ती मिशनयांच्या योजनेचा भाग असावा. त्यांच्या कडे पैसा आहे, त्यांचे ध्येय नक्की आहे (भारतात सर्वात जास्त नव-ख्रिस्ती तयार करणे) तसेच त्यांना मुत्सद्देगिरी सुद्धा चांगली जमते. भारतीय समाज हा भावनाप्रधान असल्याने ते भावना न भडकवता तसेच त्याच भावनांचा गैरफायदा घेऊन धर्मांतरे करीत असतात. चित्रपटांमधून ते त्यांच्या धर्माची ओळख करुन देत असावेत (psycological groundwork). जेणे करून जेव्हा ते प्रत्यक्ष लोकांसमक्ष जातात तेव्हा "हे काय आणखी नवीन!" असा भाव लोकांच्या चेहयावर येऊ नयेव पुढचे काम सोपे व्हावे.

खरे तर या सगळ्या प्रकाराचा सखोल अभ्यास अन चौकशीच झाली पाहिजे.

3 comments:

GS said...

100% manatale bolalas bagh. I also thought the same, but then I was wondering whether I was being paranoid about these missionaries.

bhaskarkende said...

धन्यवाद गोविंदराव!
तर मग आपणच काही माहिती काढायला सुरु केली तर! मी अशात जरा तपास सुरु केला आहे. काही कळले तर कळवतो. पण कसे कळवावे... तुमचा इमेल पत्ता पाठवा.

bhaskarkende said...

अशातच सलमान-गोविंदाचा पार्टनर बघितला. डेविड धवनच्या चित्रपटातून जास्त खोलात न जाता ज्या उथळ-मनोरंजनाची अपेक्षा असते तेच यात आहे. पण या विषयशी सुसंगत असणारी एक बाब म्हणजे पुन्हा चर्चचे बळजबरीपणे घडवलेले दर्शन. नैना (लारा दत्ता) ही अधुनिक स्त्री आपल्या नोकरीची व मुलाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असते. प्रेम (सलमान) तिच्या प्रेमात पडलेला असतो. तिला शोधन्यासाठी तो एका मोठ्या चर्चमध्ये येतो. आणि काय कमाल... ती पण असतेच ना तिथे!

चित्रपट पाहताना हा सीन म्हणजे एखादी जाहिरात ओढून ताणून बसवल्यासारखी वाटते. पण जर का निर्मात्याचा गल्ला भरला असेल तर हे करवून आणने काही आवघड थोडेच आहे?