Friday, September 21, 2007

मास्तरांची छडी

मला ना "छडी लागे..." ही म्हण तयार करणारा तो जो कोण आहे ना त्याला एकदा भेटायचय. कोवळ्या हातांवरच नव्हे तर मनावर देखील आघात करुन विद्या कशी प्रदान करणार आणि छडी न मारता का नको ते मला त्याला विचारयचय. आणि त्याच्या ह्या म्हणीमुळे कित्येक विकृत मास्तरांनी कोवळ्या बालमनावर केलेल्या अत्याचारांचा सुद्धा जाब विचारयचाय.
हेच पहा ना, आज गप्पा मारत असताना सौ.ने तिच्या लहाणपणी त्यांना असणाया एका मारकुट्या मास्तराच्या आठवणी सांगितल्या. तो मास्तर (हो, मला गुरुंबद्दल निंतात आदर आहे तरी सुद्धा अशा विकृत माणसाला मी जास्तीत जास्त एकेरीच संबोधू शकतो)... तर तो मास्तर मुलांना म्हणे चूक विधाने सांगून ते चूक आहेत की बरोबर ते विचारायचा. मुलांनी ते चूक आहे असे म्हटले तर "शहाण्या, माझे विधान चूक आहे असे म्हणतोस का" असे म्हणून बदडायचा आणि भितीपोटी बरोबर आहे असे म्हटल्यावर "गाढवा, येवढे येत नाही का" असे म्हणून हात/छडी मोकळी करायचा. या अशा राक्षसाच्या छडीने कसली विद्या मिळणार हो मुलांना?
आमचा असाच एक मास्तर होता. माझ्या वडील आणि अजोबांप्रमाणे मी पण कपाळावर गंधा लावायचो. तो मास्तर मला "टिळ्या"म्हणूनच संबोधायचा व काहीतरी कारण काढून बदडायचा. त्याची तासिका म्हटले की माझ्या पोटात भितीचा गोळा यायचा. पुढे महाविद्यालयीन जीवनात गेल्यावर कळले की तो कम्युनिस्ट विचारधारेचा होता व त्याला हिंदूत्वाच्या कोणत्याही धार्मिक चिन्हांचा राग असायचा. म्हणून मी त्याच्या घरी जायचे ठरवले. घर त्याच्या पत्नीने उघडले आणि काय चमत्कार, तिच्या कपाळावर टिकली अन गळ्यात मंगळसुत्र होते की! अर्था त्या दिवशी तो घरी नसल्याने वाचाला. नाही तर माझ्यातल्या तरुण रक्ताने त्याच्या एक-एक गुद्द्याचा हिशोब घेतला असता तर नवल नव्हते.
तर अशा या रक्षसी मास्तरांना कायद्याने आडवले जात असेल तर स्वागतर्हच नव्हे का? माझा या नवीन कायद्याला पूर्ण पाठिंबा आहे.

2 comments:

A woman from India said...

खरंच आहे. शाळा हा शब्द बरेचदा भिती या शब्दाचा समानार्थी शब्दं होऊन बसतो.
चुक झाली तरी निराश नं होता प्रयत्नं करत रहाण्यासाठीच मुलांना प्रवृत्त केले पाहिजे.

bhaskarkende said...

अरेच्चा, तुम्हाला माझ्या अनुदिनीचा पत्ता कोणी दिला? मी याच्यासाठी विचारतो आहे की मला वाटत होते जाहिरात केल्याशिवाय मला कोणी वाचक मिळणार नाहीत.

तुमच्या प्रतिसादाने लिहिण्याचा हुरुप वाढला आहे.

प्रतिसादबद्दल धन्यवाद!