Friday, December 21, 2007

राष्ट्रीय सुट्या व हिंदुंचा अनुशेष

भारताची राज्यघटना समान न्यायाच्या तत्वावर अधारलेली आहे असे रोज कुठे ना कुठे वाचायला, ऐकायला मिळत असते. त्याबरोबरच त्याच घटनेच्या आधाराने दररोज कुठे ना कुठे विषमतेने व्यवहार होतात. जात-पात मानू नका असे शाळेत शिकवायचे अन त्याच शाळेतल्या कार्यालयाने संस्कारक्षम कोवळ्या बालकांना त्यांच्या जाती विचारायच्या, जातीची प्रमाणपत्रे मागयाची/द्यायची असला भन्नाट प्रकार चाललेला असतो. जे जात मानत नाहीत त्यांना "अजात" या नव्या जातीखाली टाकण्याचे काम सुद्धा आपल्य घटनेतल्या त्रुटीनेच झाल्याचे सिद्धा झाले आहे. असो.

तर आजचा माझा मुद्दा जरा हटके आहे. मंडल, आरक्षणे वगैरे पेक्षा कदाचित हा मुद्दा कमी महत्वाचा मानला जाऊ शकतो. तो आहे शासनाच्या अधिकृत सुट्यांचा. केंद्र शासनाच्या एका संकेतस्थळावरच्या २००७ च्या सुट्यांचे हे विवरण:

धर्म - सुट्या (दिवस) - लोकसंख्येचे प्रमाण - सुट्यांचे प्रमाण
हिंदू - २ (दसरा, दिवाळी) - ८०.५% - २०% पेक्षा थोडे कमी
मुसलमान - ४ (बकरी ईद, मुहर्रम, पैगंबर जयंती, ईद-उल-फित्र) - १३.५% - ३०%
ख्रिस्ती - १ नाताळ - २.५% - १०% ला थोडे कमी
शिख - १ गुरुनानक जयंती - २% - १०% ला थोडे कमी
जैन - १ महावीर जयंती - ०.५% - १०% ला थोडे कमी
बौद्ध - १ बुद्ध पौर्णिमा - १.५% - १०% ला थोडे कमी
राष्ट्रीय सण - ३ (प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन) १००% - २०% पेक्षा थोडे कमी
एकून सुट्या - १३
टीप -
१. संकेतस्थळावर असलेल्या अमेरिकन सुट्यांना विचारात घेतलेले नाही
२. लोकसंख्येचे प्रमाण तसेच सुट्यांचे प्रमाण हे साधारण प्रमाण आहे. तंतोतंत नाही.

एकतर अधिच शासकीय कामे पटापट न झाल्याने जनतेला त्रास होत असतो. अन त्यात अशा अनेक सुट्यांची भर पडल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी सामान्यांची अवस्था होत असते. बहुतांशा धार्मिक सुट्या ह्या जनतेला धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी असतात. पण बहुंताश सुट्यांना बहुतांश जनता त्या-त्या दिवशीच्या धार्मिक उत्सवात सहभागी नसते. किती लोक नानक जयंती दिवशी गुरुद्वार्‍यात जातात? अन जे त्या दिवशी जातात ते इतर शीख-सणांना सुद्धा जातात. मग एकाच सणाला सुटी का?

जर धार्मिक/उत्सवांना सणांना सुट्या द्यायच्या आहेत तर मग त्या लोकसंख्येच्या आधारावर का नको? लोकशाहीत सगळे काही लोकसंख्येच्या बळावर असते मग सुट्याच का नको? दोन-तीन करोड लोकांच्या समुहासाठी सुटी द्यायची तर मग वर्षात किमान १०० सुट्या आणखी द्याव्या लागतील. आषाढी एकादशीला तीन-चार कोटी लोक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात ती सुद्धा त्यात आली. शक्य आहेत का १०० सुट्या? नाही ना. मग आमच्या मागण्या ऐका...

उपाय/मागण्या:
१. राष्ट्रीय सणांव्यतिरिक्त जास्तीत जास्त २-३ सार्वजनिक सुट्या ठेऊन बाकी सगळ्या सुट्या बंद कराव्यात.
२. ज्या २-३ सार्वजनिक सुट्या ठेवल्या जातील त्यात बहुतांश जनता साजरी करते अशाच उत्सव/सणांना सुट्या असाव्यात. असे सण म्हणजे दसरा व दिवाळी.
३. इतर धर्मियांच्या भावनांचा अदर ठेवण्यासाठी आणखी काही उपाय योजना कराव्यात. जसे, दिवाळी दिवशी न्यू यार्क शहरात पार्किंग फुकट होती. वगैरे.

-------

लेख - उपक्रमवर पूर्वप्रकाशित

No comments: