अमेरिकेत मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी मर्यंत दहा लाख सूर्यनमस्कार घालण्यत येणार आहेत. न्यूयार्क सारख्या मोठमोठ्या शहरांत तसेच काही राज्यांत या दरम्यान योग-दिन साजरे होत आहेत. निमित्त आहे हिंदू स्वंयसेवक संघा या स्वंयसेवी संस्थेने आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार यज्ञाचे.
हिंदू संस्कृतीने जगाला दिलेल्या अनेक मौल्यवान योगदानांपैकी एक महत्वाचे म्हणजे योग साधना. निरोगी शरीर व मनासाठी योगाभ्यासाला तोड नाही. अमेरिकेत सुद्धा योग साधनेबद्दल प्रचंड आकर्षण आहे व ते वाढतच आहे. तिथल्या प्रत्येक शहरांत योगा क्लासेसच्या नावावर अनेक संस्था भरभक्कम पैसा लाटत आहेत. हिंदू स्वयंसेवक संघ ही संस्था मात्र योगाचा लोकांना मोफत लाभ व्हावा म्हणून या सूर्यनमस्कार यज्ञाच्या रुपाने या वर्षी सलग तिसर्यांदा देशभर योगाचा प्रसार करत आहे. त्यात त्यांनी अमेरिकेतील इतरही अनेक संस्थांना सहभागी करून घेतले आहे. हिंदू जिथे जिथे जतो तिथे तिथे तो आपल्या ज्ञानाचा फायदा स्थानिक लोकांना करुन देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतो हे त्याचे एक उदाहरणच मानायला हवे.
सूर्यनमस्कारात पायाच्या बोटापासून ते मानेपर्यंत सर्व स्नायूंचा तसेच फुफ्फुसांचा व शरिरातील इतर आंतर्गत अवयवांचा व्यायाम होतो. अशा या योग पद्धतीचे महत्व पटवून देण्यासाठी या संस्थेने त्यांच्या स्वयंसेवकांच्या पुढाकाराने गावोवागी मंच स्थापन केले आहेत. दररोज अगदी दहा मिनिटांत सूर्यनमस्कार कसे करावेत, त्याचे फायदे काय हे समजाऊन देऊन लोकांना प्रव्रूत्त केले जात आहे. या अंतर्गत आयोजित केलेल्या योग मॅरेथॉन, सूर्यनमस्कार मॅरेथॉन यांना सुद्धा प्रत्येक स्तरातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी मार्गदर्शनपर माहितीपत्रके, व्हिडीओ, यांचीही मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ही माहिती त्यांच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक राज्यात गावोगावी लोकांनी वैयक्तिक वा सांघिक पद्धतीने सूर्यनमस्कार घालून त्याची नोंदणी संकेतस्थळावर करायची आहे.
अधिक माहितीसाठी www.hssus.org/sny या संकेतस्थळाला भेट द्या अथवा या sny@hssus.org विरोप (इमेल) पत्यावर संपर्क करा.
Demonetization and Mobile Banking
8 years ago