Wednesday, December 19, 2007

शिंचे म्लेंच्छ अरब

सौदी राजाने बलाक्तारीत अबलेला शिक्षा माफ केल्याची बातमी

काय तर म्हणे ती बाहेर असताना तिच्या घरच्या कोणासोबत नव्हती... म्हणून तिच्यावर झालेल्या अत्यंत हीन प्रकारातल्या अन्यायाबद्दल तिलाच दोषी ठरवून तिलाचा जेलमध्ये टाकायचे अन परत वरतून फटकेही मारायचे! वाह रे वा, काय हा धर्म? अशा धर्माच्या नावाखाली मानवतेला ठार करणा-या या नराधमांनाच फोडून काढायला हवे.

राजाने सजा माफ केली म्हणे. पण त्या स्त्रीवर अन्याय झाला व त्या अन्याय करणा-यांनाच शिक्षा झाली पाहिजे असे मात्र हे राजे महाशय म्हणाले नाहीत. थू या असल्या शिंच्या राज्यांवर! यांच्या पेक्षा आमचा राजा कुत्रा जास्त मानसाळलेला आहे. अन हे मात्र मनसाच्या रुपातले कुत्रे...म्लेंच्छ!

5 comments:

A woman from India said...

स्त्रियांच्या प्रश्नाविषयी सहानुभुतीने लिहिल्याबद्दल धन्यवाद.
हिंदु समाजातील माणुसकी काय वर्णावी? स्त्रियांवर अत्याचार होऊच नयेत म्हणुन आपण रामबाण उपाय शोधुन काढला आहे.
गेल्या वीस वर्षात दोन कोटी मुलींना जन्मापूर्वीच मारून टाकले आहे - प्रत्यक्ष जन्मदात्यांनी. जन्मालाच घातले नाही की प्रश्नंच मिटलेत, नाही का?
http://kasakaay.blogspot.com/2006/01/blog-post.html#links

bhaskarkende said...

श्री अनमिक महाशय,

आपल्याला स्त्रीविषयक प्रश्नांविषयी असलेला कैवार व त्यावर आपण करत असलेले लिखाण स्तुत्यच आहे. त्याबद्दल आपले आम्ही कौतुक करतो. परंतू आपण याचे सगळे खापर हींदू धर्मावर फोडत आहात हे पाहून मात्र आपली कीव आली.

भारतातल्या अन्य धर्मियांत स्त्री भृणहत्या होत नाही असे आपल्याला म्हणायचे आहे काय?

अरबस्तानातल्या प्रस्तुत बातमीत स्वतः न्यायव्यस्थेने स्त्रीवर अत्याचार केला आहे आणि तो सुद्धा कायद्याच्या अधाराने! भारतात कायद्याने स्त्रीवर अत्याचार केलेला माझ्या तरी माहितीत नाही. आपण सुद्धा भारताची घटना एकदा वाचून बघा. तसेच भारतातली न्यायव्यवस्था स्त्रीयांवर होणार्या अत्याचाराला आळा बसवण्याचे काम करत असते, स्वतः अत्याचार नाही करत.

तेव्हा काहीतरीच विषयांतर करुन आपला कंडू शमवण्यापेक्षा मूळ प्रश्नावर/विषयावर चर्चा का करत नाही तुम्ही? भारतात स्त्रीयांचे प्रश्न आहेतच. त्यांना सोडवण्यासाठी आपले शासन आणि आपण नागरीक सर्वच कटिबद्ध असने आवश्यक आहे. मी वैयक्तिक रित्या या प्रश्नावर होईल तेवढे जेणजागरण करुन एक जागरुक नागरिकाचे कर्तव्य पार पाडत असतो. तसेच जागतिक नागरिक म्हणून आणि एका लोकशाही देशाचे प्रतिनिधी म्हणून आपण शरियतच्या नावाखाली चालवलेल्या या हीन कृत्यांचा निषेध करु नये काय?

A woman from India said...

स्त्रियांना दिलेली दुय्यम वागणुक ही जागतिक समस्या आहे. यात धर्म मधे आणु नये हे उत्तम. तुम्ही आणलाच आहात म्हणून तुम्हाला आठवण करून देत आहे:
ज्यांचा जीव जातो त्यांच्या दृष्टिने कायद्याने मारले की प्रथेने मारले हा प्रश्न गौण आहे.
भृणहत्या जास्ती करून भारत व चीन या देशांमधे होते. भारतात हिंदुंमधेच जास्त प्रमाणात होते. हिंदुंच्या प्रभावाने इतर धर्मियांमधे थोड्या फार प्रमाणात होते.
सामाजिक प्रथांमुळे स्त्रीला जीवे मारण्याचे प्रमाण इतिहासात तसेच वर्तमानात हिंदुंमधे सर्वात जास्त आहे.
ज्याची अंमलबजावणी होत नाही तो कायदा असुन नसल्यासारखाच आहे.
हुंडाबळी व भृणहत्येच्या रूपाने जीव गमावलेल्यांमधे हिंदु स्त्रियांची संख्या दरवर्षी लाखांच्या घरात जाते.
शिवाय या हत्या हा रोग नसुन केवळ लक्षण आहे.
कायदे घटनेत लिहिले आहे या एका कारणास्तव आपण मुसलमानांपेक्षा सरस ठरतो असा अकारण गैरसमज आपण करून घेतला आहे असे वाटते.

bhaskarkende said...

स्त्रियांना दिलेली दुय्यम वागणुक ही जागतिक समस्या आहे.
--अगदी बरोब्बर बोललात.

यात धर्म मधे आणु नये हे उत्तम.
--हे वरवर पाहता योग्य वाटते. पण या चर्चेचा विषय ज्या घटनेवर आहे ती घटना एका धर्माच्या पालनासाठी एका शक्तीशाली देशाच्या न्यायसंस्थेने केलेल्या अत्याचारावर अधारीत आहे हे आपण विसरलात का?

तुम्ही आणलाच आहात म्हणून तुम्हाला आठवण करून देत आहे:
---मी आणला नाही. त्या घर्माच्या तथाकथित पालणकर्त्यांनी आणला आहे हे ध्यानात घ्या. मी त्यांच्या धर्माच्या अशा कृर आंमलबजावनीवर माझा निषेध नोंदवला आहे. जर अशा प्रकारे उद्या धर्माच्या नावाखाली भारतीय कायद्याने दुर्बल सामाजिक घटकांवर अन्याय झाला तर माझी त्यावरील प्रतिक्रिया ही केवळ निषेधावरच थांबणार नाही.

ज्यांचा जीव जातो त्यांच्या दृष्टिने कायद्याने मारले की प्रथेने मारले हा प्रश्न गौण आहे.
--बरोबर आहे. पण हे गुन्हे थांबवण्यासाठी उपाय मात्र वेगेवेगळे आहेत. जिथे कायदे जाचक तिथले कायदे मोडायला हवेत. जिथे सामाजिक प्रथा अनिष्ठ तिथल्या प्रथा तोडायला हव्यात, तो समाजच नव्हे. पुन्हा एकदा विचारतो आहे.... तुमच्या हाताला इजा झाली तर तुम्ही हात तोडणार का त्यावर उपचार करणार?

भृणहत्या जास्ती करून भारत व चीन या देशांमधे होते. भारतात हिंदुंमधेच जास्त प्रमाणात होते.
--धादांत खोटे. मी पुन्हा एकदा युनोच्या संस्थांचे अहवाल पाहिले. तुम्ही सुद्धा एकदा शोधन्याचे कष्ट घ्या. तसेच तुम्ही कोणत्या अहवाल/सर्वेक्षणाच्या अधारे बोलत आहात ते सांगाल का जरा?

हिंदुंच्या प्रभावाने इतर धर्मियांमधे थोड्या फार प्रमाणात होते.
--हा हा हा. आपल्या पराकोटीच्या हिंदूद्वेशाचे हे दर्शक नव्हे का? माणवाच्या उक्रांतीचा इतिहास चाळा जरा. माणूस नेहमी भ्रमण करत आला आहे. तो जेथे जेथे जातो तेथे तो काही पिढ्यांमध्ये तिथल्यासारखा होतो, मूळ समाजात मिसळून जातो. मुसलमान वा ख्रिस्ती टोळ्या कुठे-कुठे गेल्या आणि किती समाजात मिसळून त्यांच्यासारख्या झाल्या? की मूल समाजालाच आपल्यासारखे बनवायचा प्रयत्न केला?

हिंदू स्त्रीयांच्या प्रश्नांबाबत-- भारतातल्या तात्कालिन समाजाने स्त्रीयांना मुसलमानी आक्रमकांकडून वाचवण्यासाठी घरात ठेवायला सुरु केले. अन ती चूक प्रथा दुर्दैवाने आपल्या समाजात आली. हजारो वर्षे पुरुषांच्या बरोबरीने वागणारी हिंदू स्त्री मुसलमानी आक्रमणांच्या हजार वर्षाच्या कालखंडात कशी बंदिस्त झाली हे माहित करुन घ्याल का?

सामाजिक प्रथांमुळे स्त्रीला जीवे मारण्याचे प्रमाण इतिहासात तसेच वर्तमानात हिंदुंमधे सर्वात जास्त आहे.
--चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते या अशा. जरा त्या इतिहासाचे पुरावे देता का हो? भारताचा किमान दोन हजार वर्षांचा लिखित इतिहास अस्तित्वात आहे. तो चाळा. स्त्रीयांवर अनन्वित अत्याचार झाले ते मुसलमानी अक्रमणांच्या काळात. लाखो स्त्रीयांना अरबी लोकांनी संपत्ती म्हणून लुटले. तो काळा इतिहास आपल्याला बदलवता येणार नाही. पण आज घडणार्या काळ्या घटनांना आपण थांबवले पाहिजे.

--आणि हो, स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी मुसलमानांत जसे फतवे निघतात तसे हिंदूंमध्ये कधी निघाले याचे म्या पामराला द्न्यान नाही. जरा माहिती द्याल का?

ज्याची अंमलबजावणी होत नाही तो कायदा असुन नसल्यासारखाच आहे.
---त्याची आंमलबजावणी करवण्यासाठी सरकारवर दबाव आणने, योग्य प्रतिनिधी निवडून देणे हे तुमचे आमचे कर्तव्य नाही का? की कायदा नसल्यासारखाच आहे असे म्हणून तो तोडणार्या असामाजिक शक्तिंमध्ये आपणही सामिल व्हावे असे सुचवायचे आहे तुम्हाला?

हुंडाबळी व भृणहत्येच्या रूपाने जीव गमावलेल्यांमधे हिंदु स्त्रियांची संख्या दरवर्षी लाखांच्या घरात जाते.
शिवाय या हत्या हा रोग नसुन केवळ लक्षण आहे.
---होय, ही कीड आपल्याला आपल्या समाजातून काढायचीच आहे. त्यासाठी संघटित तसेच असंघटीत, वैयक्तिक तसेच सामाजिक पातळीवर प्रत्येकाने झटले पाहिजे. हे झटने हा आपापल्या प्रामाणिकतेवर आवलंबून आहे. त्यात सामाजिक शिक्षणाने निश्चितच फरक पडेल. फक्त तो लवकरात लवकर कसा पाडावा याची चिंता आहे.

कायदे घटनेत लिहिले आहे या एका कारणास्तव आपण मुसलमानांपेक्षा सरस ठरतो असा अकारण गैरसमज आपण करून घेतला आहे असे वाटते.
--गैरसमज तुमचा झाला आहे हे नक्की. किती मुस्लिम देशांमध्ये महिलांना किती अधिकार मिळतात? भारतातल्या मुसलमानी संस्था, संघटना सुद्धा शरियत लागू करण्याची बांग ठोकत नसतात काय? नव्हे बर्याच मुस्लीम बहूल भागांत तो अलिखित स्वरुपात आमलात आणला जात आहे. (उदा. कश्मिर, केरळ, प.बंगाल, आसाम मधील काही भाग, आपल्या मुंबईतील काही मोहल्ले. मागच्या आठवड्यात भिवंडीत पुन्हा तिसर्यांदा पोलिसांना का मार खावा लागला हो?) शरियतमध्ये महिलांना किती स्वातंत्र्य आहे? उपभोग्य वस्तूच्या पुढे महत्व आहे का?

मुल्ला-मौलवींच्या नतद्रष्ट मागण्यांना व घाणेरड्या राजकारणाला भिक न घालता भारतीय घटना स्त्रीला समानतेच्या मार्गावर न्यायला मार्गदर्शन करत आहे. त्यात तुमच्या आमच्यासारखे हिंदूच महिलांना हक्क मिळवून देण्याच्या कार्यात अग्रेसर आहेत. किती उलेमांनी तुमच्यासारखे कार्य केले आहे हे सांगा बरे? तुम्ही हिंदू असल्यानेच तुमच्यात समानतेचा विचार आहे. मुठभर मुसलमान सामजिक कार्यकर्त्यांचा अपवाद वगळता किती मुसलमान महिला कल्याणासाठी झटतात? जे झटतात त्यांचा आम्हाला नितांत आदर आहे व आम्ही त्यांना व तुम्हाला सुद्धा या कर्याबद्दल अभिवादन करतो.

आता तुम्ही जरा त्रयस्थपणे विचार करा. तुम्ही कितीही चांगले काम करण्याचा प्रयत्न केलात परंतू तो जर पूर्वग्रह दुषित असेल तर त्याचा परिणाम साध्या होत नाही. हे तुमच्या ध्यानात येत नाही का?

A woman from India said...

"भृणहत्या जास्ती करून भारत व चीन या देशांमधे होते. भारतात हिंदुंमधेच जास्त प्रमाणात होते.
--धादांत खोटे. मी पुन्हा एकदा युनोच्या संस्थांचे अहवाल पाहिले."

या विषयावर माहिती सहज उपलब्ध आहे.
१९९९: भारतात १०० स्त्रियांमागे ११२ पुरूष.
२०००:चीनमधे १०० स्त्रियांमागे ११७ पुरूष. या दोन्ही देशात व्यस्ततेचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढते आहे ते भृणहत्येमुळेच.
"सामाजिक प्रथांमुळे स्त्रीला जीवे मारण्याचे प्रमाण इतिहासात तसेच वर्तमानात हिंदुंमधे सर्वात जास्त आहे.
--चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते या अशा. जरा त्या इतिहासाचे पुरावे देता का हो?"

(सोयीस्कर विस्मरण?)इतिहासातील सती प्रथा व वर्तमानातील हुंडाबळी. पुरावे देण्याची गरज नसावी.

"मुसलमान सामजिक कार्यकर्त्यांचा अपवाद वगळता किती मुसलमान महिला कल्याणासाठी झटतात? "

यात काहीच नवल नाही. सतीप्रथा मोडित काढण्यासाठी पुरूषांनाच पुढाकार घ्यावा लागला होता. माझ्या एका जवळच्या नातेवाईक स्त्रीच्या मते (आजही) तिने रंगीत कपडे घातले तर तिला पाप तर लागेलच, वरून तिच्या दिवंगत नवर्‍यालाही सद्गती लाभणार नाही!! अशी ज्यांची ठाम समजुत करून दिलेली असते ते काय हक्कांसाठी लढणार?
अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करायला गोरे विरुद्ध गोरे असेच युद्ध व्हावे लागले.
त्यामुळे आपणच सामंजस्याने पुढाकार घेऊन हे काम करायला हवे.
एकुण तुमच्या उत्तरावरून हिंदु स्त्रियांची परिस्थिती समाधानकारक नाही या मताशी आपण स्वतःही सहमत आहात आणि ही कीड काढायला हवी हे मान्य करता आहात. असे असले तरी शिव्या फक्तं मुसलमानांनाच का म्हणुन देता?
भारतात काय किंवा सौदीमधे काय, तुम्हाला जे बदल अपेक्षित आहेत ते एका दिवसात होणारे नाहीत. स्त्रियांच्या बाजुचे कायदे होणे ही एक महत्वाची पायरी असली तरी मानसिकतेतला बदल हा सर्वात महत्वाचा आहे. कायद्याने,सुबत्तेने, धर्मांतराने इतकेच काय तर शिक्षणानेही हे बदल रातोरात घडुन येत नाहीत हे भारतासारख्या उदाहरणावरून लक्षात येते.
मुसलमान देशांमधील राजकिय परिस्थिती फार भिन्न आहे. आपण केवळ हिंदु-मुस्लिम या चष्म्यातुन या प्रश्नांकडे बघु नये.
पॅलेस्टाईनचा प्रश्न सद्द्याच्या मुस्लिम प्रश्नांच्या केंद्रस्थानी आहे. शिवाय अमेरिकेचा सौदी सरकारला व इस्त्रायलला आंधळा पाठिंबा,इराक युद्द हे महत्वाचे पैलु आहे.पॅलेस्टाईन,इराक व अफगाणिस्तानातील विस्थापितांचे प्रश्नं, लेबेनॉनच्या स्थैर्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. अशा परिस्थितीमधे कट्टरता व अतिरेकाला खतपाणी मिळते. (आता वरील वाक्यांमधे आहे ती परिस्थिती सांगितलेली आहे, समर्थन केलेले नाही. तुम्ही उगाच माझ्यावर तसा आरोप कराल म्हणून आधीच सांगितले)
इथल्या सामाजिक संस्थामधे सक्रिय असल्याने माझा अनेक देशात विविध प्रकारचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांशी संबंध येतो.
पाकिस्तान,पॅलेस्टाईन,लेबेनॉन, इराण तसेच आफ्रिकेतील मुस्लिम देशात स्त्री चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्याचे अनुभव मला ऐकायला, बघायला मिळतात. तसेच माहितीपटांच्या माध्यमातुनही थोडे फार आकलन झालेले आहे. अशा कार्यकर्त्यांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती असते. बरेचसे कार्यकर्ते त्या व्यवस्थेत राहुन सुधारणा करायचा तळमळीने प्रयत्नं करत आहेत. ख्रिश्चन व हिंदु धर्मात जसे वेळोवेळी सुधार झाले तसे इस्लाममधे होणे शक्य आहे.तसा प्रयत्नं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
या कार्यकर्त्यांचे धाडस पाहुन कौतुक वाटते. आत्मघातकी हल्ल्यांना प्रसिद्धी मिळते मिळते. या कार्यकर्त्यांबद्दल मात्रं कुठेच ऐकु येणार नाही.
तरीही त्यांच्या कार्यामुळे म्हणा किंवा कसा ही म्हणा पण मुस्लिम समाज बदलतो आहे. हा समाज सद्ध्या एका अगदी महत्वाच्या व नाजुक टप्प्यावर आहे. पुरोगामी शक्तिंनी कट्टरतेला आव्हान द्यायला सुरूवात केली आहे. येती २०-२५ वर्षे फार महत्वाची आहेत. अमेरिका, इस्त्रायल व इतरांनी मुस्लिमांना आणखी कोपर्‍यात ढकलले नाही, तसेच इराक व पॅलेस्टाईनची परिस्थिती सुधरली तर तुम्हाला निश्चितच सकारात्मक बदल लवकरच दिसुन येतील. थोडा धीर धरा.
द्वेष पसरवु नका. सकारात्मक भुमिका घ्या.
काही करायचेच असेल तर पुरोगामी कार्यकर्त्यांना मदत करा. त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्नं करा.