Wednesday, December 5, 2007

शेणाचा वास

खालील उतारा मी उपक्रमवरील या चर्चेत लिहिला होता...

http://mr.upakram.org/node/892

आमच्या बालपणी आम्ही शेणाचा सडा-सारवणासाठी, गोव-यासाठी, खतासाठी, वगैरे सर्रास वापर करीत असू. तेव्हा शेणाबद्दल विषेश अशी घाण वाटायची नाही. आता मात्रा शेणाची दुर्गंधी आल्यासारखी वाटते. शहरात राहून शेणाचा वास घेण्याची सवय मोडल्याने जाणवणारा हा फरक नक्कीच नाही. म्हणून माझ्या बालपणी गुरांच्या शेणाचा येणारा वास आणि आता गुरांच्या शेणाचा येणारा वास याविषयी मी आमच्या गावातल्या गुरांच्या डॊक्टरांशी बोललो. त्यांनी सांगितले की या पंधरा वर्षांत गाजर गवत (कॊंग्रेस गवत) तसेच बेशरम अशा विषारी तणांचा प्रश्न फारच भयानक झाला आहे. गुरे आजकाल सर्रास गाजर गवत खातात. ते विषारी असते. तसेच गुरांना मिळणारा चारा हा सुद्धा खते, किटक नाशके वगैरे सारख्या रसायनाने प्रदुषित झालेल्या शेतांतला असतो. त्यामुळे त्यातही रसायणे असतात. गुरांच्या या सगळ्या बदललेल्या आहारामुळे त्यांच्या पचनसंस्थेवर भयंकर परिणाम होत आहेत. परिणाम म्हणून शेणाचा सुद्धा घाण वास येत आहे. यातही भयंकर बाब म्हणजे छोट्या-मोठ्या शहरात कचर्यावर जगणा-या गुरांच्या शेणाचा मानवाच्या विष्ठेसारखा वास येतो.

आपला,
(गुराखी) भास्कर

2 comments:

A woman from India said...

(गुराखी) भास्कर दादा,
कृपया या लेखाला आपण "पर्यावरण" असे लेबल देऊन बघाल का?
ब्लॉगवाणी नावाच्या संकेतस्थळावर उजव्या बाजुला एक अनुसुची छोट्या मोठ्या अक्षरात दिलेली असते. तिथे "पर्यावरण" या शब्दावर टिचकी मारली असता फक्तं माझेच लेख दिसतात.
इतर लोक लेबल लावत नसल्याने वर्गीकरण होत नसावे असे वाटते.

ह्या लेखाबद्दल धन्यावाद.

A woman from India said...

अजुन दिसत नाही. बहुधा लेख पुनःप्रकाशन करावा लागेल.