आजतगायत मी अशा दोन सहका-यांसोबत काम केले आहे ज्यांना सैन्यात लढाईतला अनुभव आहे. माझा जीईतला अमेरिकन साहेब कोरियन युद्धात लढलेला. त्याने जीवनात बरेच उपद्व्याप केलेले व अजूनही करतच असतो. युद्दावरुन परत येऊन सैन्यदल सोडल्यावर या महाशयाने प्रोग्रामिंगचा अभ्यास केला. त्यात पारंगत झाल्यावर एक पुस्तकही लिहिले. पुढे जीईत आल्यावर संगणक क्षेत्रात काम केले आणि अजून तेथेच आहे. आमच्या चमूतल्या architect ला मुलगा झाला तेव्हा गंमत म्हणून डाटा मोडेलचे प्लॊटरवर प्रिंट काढून बाळाला भेट म्हणून घेऊन गेला. म्हणाला बापाने ज्या चुका केल्यात त्या तू करत जाऊ नको. एरव्ही कामात अगदी prodessional. वैयक्तिक असे एक वाक्य बोलणार नाही. सगळे त्याचा खूप आदर करत. असेच एका रात्री जेवणाला सोबत गेलो होतो तेव्हा मात्र मनातले बरेच काही सांगून गेला. त्याच्या पोराला राष्ट्राभिमान नाही, समाजाची चाड नाही, अशा गोष्टींची सल त्याच्या मनाला होती. एवढ्या मोठ्या पहाडी व्यक्तिमत्वाला सुद्धा आत ओलावा असलेले हृदय आहे हे त्याच्याशी गप्पा मारताना जाणवले.
दुसरा सहकारी बॊब (Robert McLaughlin). वय झाले आहे तरी कामातला उत्साह एखाद्य तरुणाला लाजवेल असा. नकळत मानेला बाक आला आहे तरी चालण्यातला रुबाब मात्र कामय. १९७० ला व्हियतनाम मध्ये संगणक प्रोग्रामर म्हणून होता. गुप्त माहितीची देवाण-घेवाण करणारे संगणक हाताळायचे काम याच्याकडे होते. त्याच्या दोन्ही बाजूला भाल्या मोठ्या बंदुका घेऊन चोवीस तास सैनिकांचा पहारा असे. एकदा चिवट व्हियतनामी लढवैयांनी यांच्यावर हल्ला केला तेव्हा सरळ संरक्षण मत्रालयाचा आदेश आला होता की वेळ पडली तर संगणके फोडून टाका. तो अणुभव सांगताना बॊब हळवा होतो. पण व्हियतनामी जनते बद्दल याला प्रचंड आदर आहे.
या दोन्ही सहका-यांसोबत काम करताना जाणवले की भारतात सैन्यातून आलेले लोक अशा नोक-या करताना मला का कधि दिसले नाही? भारतात तसेही एक-दोन वर्षांसाठी सैन्यात जाणारे तरुण नसतातच. जे जातात ते दहा-पंधरा वर्षे तेथेच राहतात. कारण नोकरी सोडल्यावर पुढे काय असा एक प्रश्न त्यांच्यासमोर असावा.
मला वाटतं सैनिकांना नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला संधी दिल्या पाहिजेत. त्यांच्या शिस्तबद्ध कामांमुळे इंतर क्षेत्रात त्यांच्या सहका-यांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही असते. यावर भारत सरकार काही विचार का करत नाही? आपल्याकडे एन.सी.सी. च्या पुढे जाऊन प्रत्येक तरुणाला/तरुणीला एक-दोने वर्षे सैन्याचा अनुभव घेण्याचा पर्याय का नसतो?जर मोठ्या प्रमाणावर तरुण सैन्यातला अनुभव घेऊन मग समाजात परतू लागले तर समाज शिस्तबद्ध व्हायला मदत नाही का होणार? तशी गरज आपल्या समाजाला खूप जास्त आहे असे नाही का वाटत आपल्याला?
Demonetization and Mobile Banking
7 years ago
2 comments:
मला फार छान वाट्ले
khupach chan!!Kiti chan lihile ahe,bhartat suddha military madhun alelyana sarkari nokri milatat,pan private madhe milat nahi tyacha vichar whayla hava.
Post a Comment