रोज आठ तास आम्ही तुरुंगात असतो. ५ बाय ५ च्या चौकटीत बसून बाहेरचे तापमान किती आहे ते संगणकावर पाहतो. बायकोचा फोन आला की लेकरांचा आवाज अस्पष्ट ऐकतो. आई-वडिल गावी कसे असतील याचा विचार करतो. किमान पुढच्या वर्षीची दिवाळी तरी भावंडासोबत घालवायची हा विचार करत ५ चा ठोका किती वेळाने पडणार असे म्हणत देवाने दिलेले सुंदर आयुष्य चार दमडीसाठी सडवतो.
हा तुरुंग फोडायचाय. ३६५ पैकी ३६५ दिवस शेतात उघड्या छातीने घाम गाळायचाय पण .... पोराबाळांच्या मुखात दोन घास जातील याची खात्री करून (मराठवाड्यातल्या शेतकर्याचे स्वप्न शेवटी!).
एक नाटक बसवायचय... दिनानाथ मध्ये चालवालया नाही पण संध्याकाळी गावच्या चावडीत दाखवायला.
आणी पंतप्रधान बनायचय.... समान नागरी कायदा करायला.
आपला,
(कैदी) भास्कर
http://www.misalpav.com/node/3391#comment-48221
Demonetization and Mobile Banking
7 years ago
2 comments:
too good.
mee ha asa turung roj sandhyakali fodto aani kuni mala hya gunhabaddal pakdel mhanun punha roj sakali tyach turungaat jaun basto ..
kharach faar chaan post aahe.
you are welcome to post your links on marathikatta.com
Post a Comment