वेदनांचे राज्य येथे, कर हास्याचे फवारे
भावना बंदिस्त येथे, ना वाहतात वारे||
आवसेची रात येथे, नभ बेभानले लुटेरे
काजव्यांची आस येथे, दूर प्रज्वलीत तारे||
नात्यांचा व्यापार येथे, जाणिवांही बंधल्यारे
कैवल्याची आस नाही, अवघीच बंद दारे||
जड आवाज आज माझा, उसनेच हातवारे||
मी माझेच गाण गातो, रुदनही एकलेच सारे
बोथटंच्या चाळीत येथे, ऐकेल कोण हाकारे?
------------------
कर = tax या अर्थाने वापरला आहे
आवस = अमावस्या